नवीन पासपोर्ट साठी लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत १)आधार कार्ड ( प्लास्टिकचे आधार कार्ड किंवा डुबलीकेट कॉपी चालत नाही, शक्यतो आधार कार्ड पूर्ण असावे) २)बँक पासबुक ( बँक पासबुक यावरील पत्ता तोच पाहिजे जो आधार कार्ड वर आहे पाहिजे आणि बँक पासबुक वर मागील तीन महिन्यामधील कोणती एक एन्ट्री पाहिजे) ३) शाळा सोडण्याचा दाखला किंवा पॅन कार्ड. ४)दहावी किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षण पास असल्यास त्याचे रिझल्ट ( जर अर्जदार दहावी पास असेल तरच त्याला हे डॉक्युमेंट लागतील अन्यथा नाही) सामान्यता 18 वर्षापेक्षा वरील प्रत्येक व्यक्तीला वरील प्रमाणे लागतातच लहान मुलांची पासपोर्ट काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे(१८ वर्षा पेक्षा खाली ) १ ) आधार कार्ड ( प्लास्टिकचे आधार कार्ड किंवा डुबलीकेट कॉपी चालत नाही, शक्यतो आधार कार्ड पूर्ण असावे) २ ) ४५ mm x ३५ mm २ फोटोस ३) जन्म दाखला व शाळेमध्ये असेल तर बोनाफाईट ४)आई व वडील दोघीही पासपोर्ट ऑफिस मध्ये सोबत लागणार ( वडील दुसऱ्या देशामध...